शिवार फेरी व वॉटर बजेट तयार करताना
मालखेडे – ग्रामपंचायत मालखेडे-उमरे येथे शिवार फेरी आणि वॉटर बजेट तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण पातळीवर पाण्याची उपलब्धता, वापर आणि नियोजन याबाबत माहिती देत गावातील तरुण आणि ग्रामस्थांना प्रत्यक्ष सहभाग घेण्यास प्रोत्साहित करण्यात आले. शिवार फेरी दरम्यान गावातील नाले, पिकांची स्थिती, पाणी साठवणूक, विहिरी, बंधारे व पाण्याचे स्त्रोत यांची पाहणी करण्यात आली. तसेच पाणी कसे साठवायचे, कसे वाचवायचे आणि भविष्यातील जलसंकट कसे टाळता येईल याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.