ता. एरंडोल, जि. जळगाव
ग्रामपंचायतच्या विविध कार्यक्रम, विकासकाम आणि सामाजिक उपक्रमांचे छायाचित्रे
🏠 मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर यावर सवलत.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत मालखेडे–उमरें ग्रुप ग्रामपंचायतीत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात सुमारे ७० नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली आणि गरजू लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आले.
दिनांक 22/11/25 रोजी जिल्हा परिषद जळगाव येथे ग्रामपंचायती कडून राबविलेले विविध उपक्रम तसेच ग्रामपंचायत ISO केल्याबद्दल बद्दल पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव मा.नामदार श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी सो.तसेच सर्व विभाग प्रमुख जिल्हा परिषद जळगाव यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
गृप ग्रामपंचायत मालखेडे-उमरे येथे ५% दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत लाभार्थी दिव्यांग बांधवांना एरंडोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. दादाजी जाधव यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. कार्यक्रमात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामविकास व सुशासन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छता, जलसंधारण, हरित उपक्रम, मनरेगा, महिला-युवती विकास, दिव्यांग उपजीविका, लोकसहभाग व गावाचा सर्वांगीण विकास यावर पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या भेटीत शाळा, अंगणवाडी, पाणी योजना व स्वच्छता उपक्रमांचा देखील आढावा घेण्यात आला.
मालखेडे-उमरे ग्रुप ग्रामपंचायतीत संविधान दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे आणि योग्य आहार, स्वच्छता, पोषण याविषयी मार्गदर्शन करणे हा या शिबिराचा उद्देश होता. स्थानिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय तज्ञांनी महिलांना समतोल आहार, स्वच्छ पाणी, मासिक पाळी स्वच्छता, घरातील स्वच्छता, व्यायाम व आरोग्यदायी जीवनशैली याबद्दल सखोल माहिती दिली. तसेच विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरात महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली आणि संवादात्मक पद्धतीने आरोग्य शिक्षणाचे सत्र घेण्यात आले
गावातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरामध्ये रक्तदाब, तापमान, श्वसन, साखर इत्यादी मूलभूत आरोग्य तपासण्या करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले.
गावातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरामध्ये रक्तदाब, तापमान, श्वसन, साखर इत्यादी मूलभूत आरोग्य तपासण्या करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले.
ग्रामपंचायत मालखेडे-उमरे यांच्या पुढाकाराने स्थानिक युवकांनी कचरा संकलन व स्वच्छता उपक्रम राबवून पर्यावरण जनजागृती घडवली. स्वच्छतेची गरज आणि गावातील कचरा व्यवस्थापन याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी रविवारी सकाळी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
मालखेडे–उमरे ग्रुप ग्रामपंचायतीत नवीन अधिकृत बोधचिन्ह (Logo) आणि “ग्राम समृद्ध भविष्याकडे” हा नवीन घोषवाक्य नुकताच जाहीर करण्यात आला. हा उपक्रम ता. एरंडोल तालुक्यातील पहिलाच असा उपक्रम ठरला असून गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.